शिरूर कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी तसेच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी प्रविण चंपालाल चोरडीया यांची निवड…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 13/08/2021.

      शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, विकास आबा शिवले यांनी राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या जागेसाठी उपसभापती निवडीसाठी, बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी बाजार समिती, शिरूर येथील सभागृहात संचालकांची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरुरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांनी, उपसभापती पदासाठी प्रवीण चोरडिया यांचा एकच अर्ज सादर झाल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.


या निवडीवेळी शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवी काळे, बाजार समितीचे सभापती ऍड. वसंत कोरेकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती शंकर जांभळकर, खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पंडितआप्पा दरेकर, माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर उपसभापती विश्वास ढमढेरे , विकास शिवले, संचालक आबा मांढरे, विजेंद्र गद्रे, सतीश कोळपे, सुदीप गुंदेचा, बंडू जाधव, छाया बेनके, मंदाकिनी पवार, व सचिव अनिल ढोकले यांसह आप्पा बेनके, घोडगंगा सहकरी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. रंगनाथ थोरात, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     या निवडीनंतर नवनिर्वाचित उपसभापती प्रवीण चोरडिया यांचा, शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर त्यांच्या निवडीने व्यापारी वर्गातून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *