रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ भारत युवा पुरस्काराने सन्मानित.

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील भूमिपुत्र व रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल दिलीप भुजबळ यांना गुरुवारी (ता.१२) रोजी केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते भारत युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारत गौरव अवॉर्ड फौंउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने जनपथ परिसरातील प्रमुख पंचतारांकित हॉटेल शांग्रीला इरोज येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारत युवा पुरस्कार २०२१ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर तथा केंद्रीय ग्रामीण विकास तथा इस्पात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉन बारला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत, लोकसभा सदस्य सुधीर गुप्ता, लोकसभा सदस्य श्याम सिंग यादव, रिपब्लिक ऑफ इथोपियाचे अँम्बेसेडर डॉ. तिझिता मुलुगेटा, अतिरिक्त मुख्य सचिव ज्योती कलाश, एनसीएमईलचे संचालक जस्टीस एन.के. जैन, सहाय्यक आयुक्त भारत सरकार दिनेश जगींड, अटीका गोल्ड कंपनीचे संचालक डॉ. बॉम्मानहल्ली बाबू तसेच भारत गौरव अवॉर्ड फौंउंडेशनचे सहसचिव संदेश यादव यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते रेल्वे मंत्रालय भारत सरकारच्या सल्लागार समितीचे सदस्य विशाल भुजबळ, महाराष्ट्रातील खासदार श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकसभा सदस्य, संचालक, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, युथ आयकॉन, लेखक यांना भारत युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशाल भुजबळ यांची भारत सरकारच्या रेल्वे विकास समितीचे सल्लागार सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर पुरेशा सुविधामध्ये पाणी, सुरक्षा आणि चांगले अन्न देण्याबाबत स्वतः प्रशासनाशी बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेकांना कोरोना काळात मदतीचा हात दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारत गौरव युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, मानव विकास व मानवी मूल्यांच्या पेरणीसाठी राजकारणात युवकांनी यावे ही काळाची गरज आहे, युवक हे देश विकासाचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक युवकांना एकत्रित करत गेलो तर युवकांकडून व्यापक स्वरुपामध्ये देशसेवा घडून येईल असे त्यांनी मत मांडले.
या कार्यक्रमामध्ये विशेष पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या ईथियोपियाच्या राजदूतांनी विशाल भुजबळ यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *