बंदी असताना भिमाशंकरला पर्यंटनास येणाऱ्या नागरिकांकडून ३,३३,३०० इतका दंड वसूल -घोडेगाव पोलिसांची धडक कारवाई…

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
राज्यात कोरोनाचे रूग्ण अद्यापही कमी झालेले नाही तसेच कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेशाने पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भीमाशंकर मंदिर, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे, इत्यादी. ठिकाणी जाण्यास किंवा लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध अजूनही कायम आहे.त्यामुळे सदर बंदी असलेल्या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश मोडून येणाऱ्या लोकांवर पोलीस केसेस दाखल करीत आहेत, किंवा दंडात्मक कारवाई करीत आहेत

     मागील ४ दिवसांमध्ये नागरिकांना  भीमाशंकर मंदिराकडे जाऊ न दिल्यामुळे त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून भांडण केल्यामुळे, शासकीय कामात अडथळा आणला व माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे यांचे आदेश मोडल्याने सदर नागरिकांवर तिन गुन्हे देखिल दाखल झाले आहेत. त्यातील आरोपींना अटक करून सध्या ते मा. न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडी मध्ये येरवडा जेल याठिकाणी आहेत.

   तसेच मागील महिन्यात सदर ठिकाणी येणाऱ्या नागरिकांवर  एकुण  १०२० केसेस व रुपये ३,३३,३००  इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी दिली.

     तसेच  सर्वांनी नियम पाळावेत. नियम सर्वांना सारखेच आहे बंदी असताना नियम तोडून येण्याचा प्रयन्न केल्यास कायदेशीर कारवाई केली  जाईल त्यामुळे बंदी असलेल्या पर्यटन स्थळ व भिमाशंकर मंदीर परिसर या ठिकाणी कोणी  येवू नये असे अवाहन जनतेला घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *