घोडेगाव येथे आदिवासी बांधवांच्या पारंपरिक कला व सद्यस्थिती” या विषयावर झूमवर आॕनलाईन व्याख्यान संपन्न…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने  विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे हे होते.याप्रसंगी नागपूर येथील आदिवासी समाजाच्या अभ्यासक  मोहिनी गवई यांचे
“आदिवासींच्या पारंपरिक कला व सद्यस्थिती” या विषयावर झूमवर आॕनलाईन व्याख्यान संपन्न झाले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. धनंजय लोखंडे (संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आय.बी.जाधव यांनी तर सुत्रसंचालन प्रा.सचिन घायतडके यांनी केले.डॉ. गुलाबराव पारखे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *