मंचर ला नगरपंचायत होण्यासाठी भाजपा चे उपोषण…

” मंचर नगरपंचायत महाविकास आघाडी सरकारमुळे होत नाही. श्रेय वादामुळे हा विषय प्रलंबित राहिला आहे. यासंदर्भात भाजपाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याचे सांगून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाऊन या संदर्भात दाद मागितली जाईल ” असे प्रतिपादन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले.
     आज भाजपा च्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून मंचर शहरात नगरपंचायत होण्यासाठी तसेच राज्य सरकार करीत असलेल्या दिरंगाई च्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाला मंचर मधील सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिल्यामुळे मंचर शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. ” मंचर ला नगरपंचायत होणे ही काळाची गरज असल्याचे ” मत या उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी व्यक्त केले. तसेच ” मंचर शहरात नगरपंचायत होण्यासाठी तालुक्यातील दोन मोठ्या नेत्यांकडून खोडा घातला जात असल्याची टीका ” माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले  याप्रसंगी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष बाळासाहेब  बाणखेले यांनी आपण ” राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपराव  वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंचर नगरपंचायतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे ” आश्वासन येथे दिले.

    मंचर नगरंचायतीच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला विविध सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग, युवक यांनी पाठिंबा दिला याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय थोरात, तालुका अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे,जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे,संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, विजय पवार, भानुदास नाना काळे,शहर अध्यक्ष नवनाथ थोरात,सुशांत थोरात, गणेश बाणखेले, रोहन खानदेशे, सोनाली काळे, स्नेहल चासकर, माऊलीनाना बाणखेले,कालिदास गांजाळे,प्रशांत बाणखेले, विकास बाणखेले, विजय शिंदे आदी उपस्थित होते. माजी सरपंच दत्ता गांजाळे, मा.उपसरपंच धनेश मोरडे, रंगनाथ थोरात, ग्रा.प. सदस्य अरूण बाणखेले,वसंत बाणखेले, मा. उपसरपंच गणपत क्षीरसागर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाई इनामदार, मनसे उपजिल्हा प्रमुख वैभव बाणखेले, भगवान गांजाळे, रंगनाथ थोरात, गणेश खानदेशे यांनी भेट उपोषणास भेट दिली. यासंदर्भात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे व भाजपा किसान मोर्चा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली. तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी मंचर शहर नगरपंचायत लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *