राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ पिंकी कथे यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

सोळा वर्षाच्या यशस्वी आरोग्य सेवेबद्दल नवभारत वृत्त समूहाने केला गौरव

राजभवन मुंबई (किरण वाजगे)
महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे डॉ. पिंकी पंजाबराव कथे यांना राज्यस्तरीय आरोग्य गौरव पुरस्कार देण्यात आला.
याप्रसंगी नवभारत वृत्त समूहाचे कार्यकारी संचालक निमिष माहेश्वरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सीईओ श्री सिंग, राजेश वरलेकर तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पुरस्कार प्राप्त डॉक्टर उपस्थित होते.
रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये गेली सोळा वर्षे अविरतपणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच मागील दीड वर्षांमध्ये कोविड काळात आदर्शवत सेवा बजावल्याबद्दल डॉ पिंकी पंजाबराव कथे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
डॉक्टर पिंकी कथे यांचे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्यातील मंचर, खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर अविरत सुरु आहे. तसेच शिरूर शहरात नव्याने सेंटर सुरू होत आहे. हे सर्व सेंटर्स मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *