पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना मदत..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी-दि. ३१ जुलै २०२१ जुलै महिण्यात कोकण विभागात अतिवृष्टी झाली. खेड, चिपळूण, महाड मधिल अनेक गावात आलेल्या पुरामध्ये हजारो नागरिकांचे संसार वाहून गेले. तळये गावातील भूस्सखलन झाल्यामुळे जिवीतहानी झाली. या नैसर्गिक संकटापुढे हार न मानणा-या कोकण वासियांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून अनेक पक्ष, संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी कोकण वासियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसने किराणा माल व जीवनावश्यक वस्तू व साहित्य एकत्रित करुन महाड, खेड, चिपळूण परिसरातील कुटूंबियांना देण्यासाठी शनिवारी (दि. 31 जुलै) बारा टेम्पो रवाना केले.

यावेळी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या निगार बासरकर, शामला सोनवणे, युवक काँग्रेस नावे – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, कॉंग्रेस लिगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, हिरामण खवळे, कौस्तुभ नवले, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस सरचिटणीस- चंद्रशेखर जाधव, कुंदन कसबे, वासिम शेख, गौरव चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष – संदेश बोर्डे, जिफिन जॉन्सन, विवेक भाट, नीता चामले, सन्नी पगारे, सागर देवकुळे, तन्मय देवकुळे, सन्नी धर्मशाळे, बिंदू तिवारी, शोभा पगारे, विनीता तिवारी, हुरबानू शेख, मीना गायकवाड, विद्या नवले, ज्योती कांबळे, निता चामले, कमला श्रोत्री, नाझीया बारसकर, उषा खवळे, ताई भोसले, रानी धर्मशाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *