वारणा धरणात 31 टी.एम.सी. पाणीसाठा…

सांगली, दि. 30

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.01 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 89.07 (105.25), धोम 10.30 (13.50), कन्हेर 7.75 (10.10), दूधगंगा 21.45 (25.40), राधानगरी 8.28 (8.36), तुळशी 3.09 (3.47), कासारी 2.24 (2.77), पाटगांव 3.38 (3.72), धोम बलकवडी 3.37 (4.08), उरमोडी 7.34 (9.97), तारळी 5.02 (5.85), अलमट्टी 86.85 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 50614, धोम 6327, कण्हेर 5560, वारणा 14389, दुधगंगा 4600, राधानगरी 1400, तुळशी 1521, कासारी 1250, पाटगांव 250, धोम बलकवडी 398, उरमोडी 1986, तारळी 1712 व अलमट्टी 4 लाख 8 हजार 123 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 22.0 (45), आयर्विन पूल सांगली 36.5 (40) व अंकली पूल हरिपूर 43.1 (45.11).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *