वीजपुरवठा संबंधीचे महावितरणचे डी पी बॉक्स व ट्रान्सफार्मर राहिवाशी क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर असावे- महापौर उषा उर्फ माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी-  दिनांक ३० जूलै २०२१
पिंपरी चिंचवड सर्वसामान्य नागरिकांचा जीविताचा विचार करुन वीज पुरवठ्यासंबंधी महावितरणचे डि.पी.बॉक्स, ट्रान्सफार्मर हे रहिवाशी क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर असावेत, तसेच पावसामुळे डी.पी.बॉक्स  व ट्रान्सफार्मर व उघड्यावर असणा-या वीजेच्या केबल यांच्या आजूबाजूस वाढलेली झाडे व झाडाच्या फांद्या छाटणे अत्यंत आवश्यक  असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी व पुणे जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक, विधान भवन विभागीय आयुक्त कायालय पुणे, येथे मा.पालकमंत्री.श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हयामधील विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणा-या विविध विद्युत विषयक अडीअडचणी समस्यांबाबत महापौर सौ.माई ढोरे यांनी सविस्तर माहिती देत असताना सांगितले की, सध्या पावसामुळे महावितरणकडील वीजेचे डी.पी.बॉक्स व ट्रान्सफार्मर भोवती तसेच आजूबाजूस मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली असल्याने झाडाच्या फांद्या छाटणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात घडणा-या दुर्घटना अथवा अपघात टाळणे शक्य होणार असल्याचे तसेच सध्या पावसाळ्यामध्ये वीजेच्या अनिश्चित व अनियमित पुरवठ्याबाबत देखील त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *