खंडणीबहाद्दर वैभव आदक याच्यावर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई – हेमंत शेडगे, पो. नि. शिक्रापूर

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे.
शिक्रापूर : दि. 28/07/2021.

गेल्या काही दिवसांपूर्वी शिक्रापूर, ता. शिरुर, जी. पुणे येथील पोलीस स्टेशन मध्ये, खंडणी मागणाऱ्या बहाद्दरावर गुन्हा दाखल झालेला होता.
सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर परिसरात तसेच येथून जवळच असलेल्या एमआयडीसी परिसरातील कंपनी व्यवस्थापकांना, हत्याराचा धाक दाखवून खंडणी उकळणारा युवक वैभव संभाजी आदक, सध्या राहणार शिक्रापूर, मूळचा राहणार अष्टापुर, ता. हवेली, याला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी हत्यारांसह अटक केलेली होती. पोलिसांनी जनतेला आवाहन केल्यानंतर, अनेकांनी भीती सोडून पुढे येत आदक विरुद्ध अनेक खंडणीचे गुन्हे दाखल झालेले होते.


मात्र त्यांनतर आता सदर आरोपीवर शिक्रापूर पोलिसांच्या पुढाकाराने, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अर्थात मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता असे गुन्हे करणाऱ्यांना मोठा धाक बसून लोकांना थोडासा दिलासा मिळेल.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर (ता. शिरुर) या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोडवर एक युवक हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली होती. त्यामुळे ताबडतोब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, पोलीस हवालदार अमरदिन चमनशेख, जितेंद्र पानसरे, सचिन होळकर, पोलीस नाईक अमोल दांडगे, संतोष होनमाने, विकास पाटील, सागर कोंढाळकर, शिवाजी चितारे, संतोष शिंदे, जयराम देवकर, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, निखिळ रावडे, किशोर शिवणकर, अमोल नलगे, राहुल वाघमोडे आदींनी शिक्रापूर तळेगाव रोड परिसरात जात, वैभव संभाजी आदक (वय वर्ष २३) सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, व मूळचा रा. पठारे वस्ती, अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी सदर आरोपीकडून कोणाला काही त्रास झाला असेल, अथवा कोणाकडे खंडणी मागितली असेल, तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले असताना वैभव आदक याचेवर पुन्हा चार खंडणीचे व हानामारीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी वैभव आदक याच्याविरुद्ध, संघटीत गुन्हेगारी अर्थात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाल करुन, तो पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिलेला होता. त्यास मान्यता मिळाली असून, वैभव आदक याचेविरुद्ध, संघटीत गुन्हेगारी अर्थात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत.
शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केलेला वैभव आदक हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, कंपन्यांच्या व्यवस्थापकांना खंडणी मागणे, धमकावणे अशी त्याची सवय असल्याने, परिसरातील कोणाची याबाबत तक्रार असेल अथवा कोणाकडे खंडणी मागितली असेल तर शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा, अथवा 9923600017 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *