माझे व माझी नगरसेविका पत्नीचे एक महिन्याचे वेतन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात यावे.-माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २७ जुलै २०२१
माझे व माझी पत्नी नगरसेविका सौ. शितल विठ्ठल (नाना) काटे आमचे एक महिन्याचे वेतन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात यावे. असे पत्र माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना देऊन एक सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडवले.
महाराष्ट्रातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील भागात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये अनेक नागरिकांचे संसार, दुकान, शेती यांचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. यात कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.

एक हात मदतीचा म्हणून मी आपणास विनंती करतो की, नागरिक पर्यटनाकरिता कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक व देवदर्शनाला जातात. यापूर्वीही चक्रीवादळ यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण व कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार व खासदार यांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही बाब विचारात घेत मी माझे व माझ्या पत्नीचे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मिळणारे एक महिन्याचे वेतन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात यावे अशी आपणास विनंती करतो. तसेच शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी द्यावे अशी विनंती त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *