स्त्रीयांचे वेषांतर करून फिरणाऱ्या आरोपी हरीश महादू कानसकर याला अटक…

सहा महिन्यांपासून फरार असलेला व वेषांतर करून राहणारा खंडणी प्रकरणातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

नारायणगाव, (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
मंचर (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकांकडून पैशाची मागणी करून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी हरीश महादू कानसकर (रा.रांजणी ता. आंबेगाव जि. पुणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
गेली सहा महिन्यांपासून फरार असलेला तसेच वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फिरून वेषांतर करून राहणारा व प्रसंगी स्त्रियांचा वेश परिधान करून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी हरीश कानस्कर याच्यावर खंडणी व इतर स्वरूपाचे अनेक गुन्हे मंचर पोलीस स्थानकात दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये एल सी बी चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांच्या टीमने शिताफीने आरोपी कानस्कर याला मुंबई येथील दातिवली, दिवा येथून ताब्यात घेतले. या घटनेची मुंब्रा पोलीस स्टेशन येथे माहिती देऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
या आरोपीवर मंचर पोलीस स्थानका मध्ये पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) गु.र.नं. ६३/२०२१ मुं.प्रो.का.क.६८
२) गु.र.नं. ६९/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४, ३८५
३) गु.र.नं ७०/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४, ३८५
४) गु.र.नं ७१/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४, ३८५
५) गु.र.नं ७४/२०२१, भा. दं. वि. कलम ३२८, १८२, २७२, २७३ सह मुं. प्रो. का. कलम ६८ सह अ. सु. मा. का. क. २६(२), २६(४)
६) गु.र.नं ७८/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४, ३८५, ५०४, ३४
७) गु.र.नं ८६/२०२१ भा. दं. वि. कलम ३८५, ५०६, ३४
८) गु.र.नं ८८/२०२१ भा. दं. वि. कलम ४५२, ३८४, ३८५, ३५४(अ), ३५५, ३६३, ५०४, ५०६, ३४ सह अपंग व्यक्तीचे अधिकार सन २०१९ चे कलम ९२
९) गु.र.नं ९३/२०२१, भा. दं. वि. कलम ३९२, १७१, ४२०, ३४
१०) गु.र.नं ९८/२०२१, भा. दं. वि. कलम ३८४,३८५,३४
या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पो.निरिक्षक नेताजी गंधारे, पो. हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकिर, गायकवाड
पो.नाईक संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *