महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली खेडकर कुटुंबीयांची भेट…दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या दुःखद घटनेची केले सांत्वन..

संगमनेर
तमाशा सृष्टीतील ज्येष्ठ फडमालक रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा फड मालक स्व. कांताबाई सातारकर, भगिनी स्व. अनिता, व भाचा स्व. बबलू यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले. या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांनी रघुवीर खेडकर कुटुंबीयांची आज सांत्वनपर भेट घेतली.
कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण गेली दोन महिने होऊनही खेडकर कुटुंबियांना भेट देऊ शकलो नाही याबाबत नामदार बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले. खेडकर कुटुंबीयांचे तमाशा श्रुष्टीतील योगदान खूप मोठे असून पारंपारिक तमाशा कला जोपासण्याचे व सजनप्रबोधनाचे काम अविरतपणे खेडकर कुटुंबीयांनी केले असल्याच्या भावना नामदार थोरात यांनी यावेळी व्यक्त केल्या.


याप्रसंगी जेष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ.संतोष खेडलेकर, नगरसेवक विश्वास मुर्तडक, हिरालाल पगडाल, मिलिंद औटी, पवन गोसावी, तमाशा व्यवस्थापक शफीभाई शेख, आलोक बर्डे, शामसुंदर कुलकर्णी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे तसेच खेडकर कुटुंबियातील सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते ….ब्युरो रिपोर्ट संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *