फळझाडांमध्ये दगडी कलम करण्याबाबत कृषी कन्येकडून मार्गदर्शन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.21/7/2021

फळझाडांमध्ये दगडी कलम करण्याबाबत कृषी कन्येकडून मार्गदर्शन

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे :- आंबा या फळझाडांमध्ये दगडी कलम कशाप्रकारे करायचे त्याची योग्य पद्धती व यापासूनचे असणारे फायदे सांगून शेतकऱ्यांनी घरी कलम कसे करायचे याबाबतचे मार्गदर्शन कृषिकन्या वैष्णवी खोकराळे हिने हिवरे तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्यांना केले.
कृषी महाविद्यालय भानस हिवरे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या महाविद्यालयातील कृषिकन्या वैष्णवी खोकराळे तिने अभ्यास दौऱ्यामध्ये हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्यांना आंबा या फळझाडांमध्ये केल्या जाणाऱ्या दगडी कलम ,ग्राफ्टिंग कसे करायचे हे कलम करण्याची योग्य पद्धत व त्याचे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना त्यांच्या घरी कलम करण्यासाठी मार्गदर्शन केले. ग्रामीण कृषी जागृकता आणि औद्योगिक कार्यानुभव रावे कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून माती परीक्षण,बीज प्रक्रिया ,निंबोळी अर्क, पीक नियोजन,पशुखाद्य प्रक्रिया इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकासाठी प्राचार्य डॉ. ए. ए. दरंदले कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एम .आर .माने यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *