प्रांजलचे चारवेळा लिम्का मध्ये नाव ,जुन्नर तहसीलदारांकडून तिच्या कामगिरीचे कौतुक…

ओझर प्रतिनिधी:मंगेश शेळके

दि.१९ जुलै २०२१(ओझर) : प्रांजल चव्हाण या या चिमुकलीने आतापर्यंत चार वेळा ‘लिम्का बुक आँफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविले आहे.तिने विविध कौशल्य प्राप्त करून यश मिळविले असून तिच्या या कामगिरीची दखल घेत जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.प्रांजल उद्धव चव्हाण हि मूळ देवताळा ( जि.लातूर ) येथील असून तिचे वडील जुन्नर महसूल विभागात कार्यरत आहे. या साडे चार वर्षीय चिमुकलीने आतापर्यंत चार वेळा इंडिया बुक आँफ रेकॉर्डमध्ये आणि तीन वेळा आशिया बुक आँफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे.त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई शिखर सर करणे ,४० प्रसिद्ध साहित्याची नावे ५९ सेकंदामध्ये सांगणे .भारतातील प्रसिद्ध व्यक्तींच्या ५४ समाधी स्थळांची नावे सांगणे , भारतातील प्रसिद्ध ४१ नदी आणि तिच्या उगमस्थानांची नावे एका मिनिटांत सांगणे असे विविध विक्रम तिने केले आहे. वल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीकडून ग्रँडमास्टर टायटल इन रेकॉर्ड ब्रेकींगचाही बहुमान तिला प्राप्त झाला आहे. प्रांजलने काही दिवसांपूर्वीच ६ मिनीटांमध्ये तब्बल २४० सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे दिली होती. यावेळी जुन्नर तलाठी संघटनेचे अध्यक्ष रूपेश इलग ,उपाध्यक्ष गर्जे शितल ,सचिव अमर खसाळे ,प्रांजलचे आई-वडील उद्धव आणि दिपाली चव्हाण तसेच तहसील कार्यालय जुन्नर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *