जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटमदरा येथे खावटी अनुदान योजना सन २०२१ च्या वितरणास प्रारंभ…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,घोडेगाव व प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ,जुन्नर अंतर्गत उपप्रादेशिक  कार्यालय घोडेगाव  यांचे मार्फत आंबेगाव तालुका अंतर्गत खावटी अनुदान योजना
सन २०२१ वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  कोटमदरा ता.आंबेगाव जि.पूणे येथे संपन्न झाला.


         महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभाग मार्फत सन २०२०-२०२१ मध्ये कोव्हीड-१९ विषाणू प्रादुर्भाव वाढल्याने  खावटी अनुदान योजना पुर्नजीवित करून आदिवासी बांधवांना DBT द्वारे त्यांचे  वैयत्तिक  खातेवर रोख रक्कम दोन हजार व २०००=०० किंमतीचे अन्नधान्य वाटप स्वरूपात वाटप योजना स्वरूप असून यात घोडेगाव प्रकल्प अंतर्गत येणारे पुणे, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा २४ वसतिगृह यांचे सर्व वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी मार्फत सर्व्हे करून २०८६५ लाभार्थी फॉर्म भरले यापैकी निकषांनुसार १३८६२ लाभार्थी पाञ ठरून त्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थी काम प्रगती पथावर सुरू आहे असे प्रतिपादन प्रास्ताविक पर भाषणात श्री. नवनाथ भवारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले.


       महाराष्ट्र शासनाने सूरू केलेली खावटी अनुदान योजना ही सद्यस्थितित आदिवासी बांधवांना खूप महत्वाची असून याद्वारे रोजगार आवश्यक असणारे कुटुंबांना शासनाद्वारे खुपच मदत झाली याबद्दल  आदिवासी विकास मंञी मा.ना.श्री. के.सी.पाडवी साहेब , राज्याचे गृहमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे आभार मा.श्री. संजय गवारी सभापती पंचायत समिती आंबेगाव यांनी मानले.खावटी अनुदान योजना अन्नधान्य कीट वाटप कार्यक्रम  श्रीम.जागृती कुमरे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांचेमार्गदर्शनाखाली संपन्न झाला
याप्रसंगी मा.श्री. संजय गवारी सभापती पंचायत समिती आंबेगाव, मा.श्रीम.मनिषा काळे सरपंच कोळवाडी-कोटमदरा ग्राम पंचायत , उप सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य,प्रतिष्ठित नागरिक कोकणे गुरूजी, बिरसा मुंडा समिती पदाधिकारी,  श्री. जालिंदर पठारे गटविकास अधिकारी आंबेगाव,  श्री.योगेश खंदारे कार्यालय अधिक्षक प्रकल्प घोडेगाव, श्री. नवनाथ भवारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, श्री. संतोष मुनेश्वर निरीक्षक,श्री. राजाराम गाडेकर वरिष्ठ लिपीक,श्रीम.अरूणा घोडेकर  कनिष्ठ लिपिक ,श्रीम. गीतांजली दातीर मॅडम, श्रीम. निकम मॅडम आदिवासी विकास महामंडळ घोडेगाव, श्री.भालेराव साहेब पंचायत समिती आंबेगाव उपस्थित होते.
        सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होणेस्तव श्री. सुरेश दुरगुडे, श्री. विष्णू साखरे,श्री. विपुल टकले, श्री. संजय भोजने,श्री. अशोक उदगिरे,श्री. प्रसाद लोहकरे,श्रीम.अनिता करंजकर,श्री. घुले यांनी विशेष प्रयत्न केले तर सदर कार्यक्रम सुञसंचालन श्री. चंद्रकांत नाईकडे यांनी तर आभार श्री. लोहकरे ग्राम पंचायत सदस्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *