येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पाहणी करून आढावा बैठक पार पडली – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी 
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय सध्या पुणे येथील जुन्या मध्यवर्ती इमारतीमध्ये आहे. हे कार्यालय येरवडा कारागृहातील जागेवर नवी इमारत बांधून तेथे हलविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.


कैद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी सीआरपीसी मध्ये दुरुस्ती करून जास्तीत जास्त प्रमाणात व्ही.सी.चा वापर करून न्यायप्रक्रिया जलद करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. यामुळे शासनाचा निधी व मनुष्यबळाची बचत होईल.


कारागृहात सध्या पुरुष कैद्यांसाठी खुली वसाहत आहे. त्या अनुषंगाने महिलांसाठी देखील खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. तसेच परदेशातील कारागृहाप्रमाणे मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात बहुमजली कारागृहाची उभारणी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *