नळवणे गावचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया च्या मंदिरात ३ चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न :- सायरन वाजल्याने चोरट्यांनी केले पलायन..

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.17/7/2021

नळवणे गावचे कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया च्या मंदिरात ३ चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न :- सायरन वाजल्याने चोरट्यांनी केले पलायन

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे दि.१७:- तमाम महाराष्ट्राचे,नळवणे (ता.जुन्नर) गावचे कुलदैवत, श्रद्धास्थान व ग्रामदैवत श्री कुलस्वामी खंडेराया च्या गडावर शुक्रवारी रात्री १.०५ वाजता तीन चोरट्यांनी मंदिर आवारात प्रवेश करून मंदिराचा पुढील दरवाजा फोडला परंतु स्वयंचलित सायरन यंत्रणा चालू होऊन गडावरील सायरन चालू झाले व सुरक्षा रक्षकांनी सतर्कतेने दुसरा सायरन वाजल्याने चोर पळून गेले. सर्व परिसरात सायरनचा आवाज गेल्याने गावातील सतर्क नागरिकांनी ताबडतोब मंदिराकडे अवघ्या १५ मिनिटात धाव घेत गडावर पोहचले.केवळ देवस्थानची सतर्क सुरक्षा यंत्रणा व गावातील अंदाजे ८० ते १०० जागरूक नागरिक पोहचल्यामुळे चोर पळून गेले व चोर चोरी करू शकले नाही. आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित झाले.
आज सकाळी पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी कर्मचारी सह देवस्थानला भेट देऊन पाहणी केली. देवस्थानच सीसी टीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.गावच्या नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली तसेच या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *