वीज समस्यामुक्त शहरासाठी आमदार लांडगेंकडून महावितरणला अल्टीमेटम – भोसरीतील महावितरणकार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक – ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न…

पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट शिवसेनेच्या मागणीची दखल

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १३ जुलै २०२१
पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन आणि महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असतानाच आमदार महेश लांडगे यांनी ‘ऑन दी स्पॉट’ भेट देत समस्या निकालात काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘वीज समस्यामुक्त शहर’ अशी शहराची ओळख व्हावी, असा संकल्प करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महावितरण प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा, कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे शहरातील वीज सेवेवर परिणाम झाला होता. विद्यार्थी, गृहिणी यांच्यासह वर्क फ्रॉम होम करणाऱे कर्मचारी, आयटी क्षेत्रातील कामगार यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांची वीज समस्यांमधून सुटका करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पावसाळी अधिवेशनात निवेदन दिले होते.
दरम्यान, महावितरण कार्यकारी अभियंता राहुल गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी, सहायक अभियंता यांच्या उपस्थित पावर हाउस, बालाजीनगर येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी भोसरी मतदार संघातील धोकादयक पोल हटवणे, ट्रान्सफार्मर शिफ्ट करणे, मिनी डीपी बॉक्स शिफ्ट करणे, ट्रान्सफार्मर कपॅसिटी वाढवणे, नवीन ट्रान्सफार्मर सारखे अनेक प्रस्ताव डीपीडीसी योजनेंतर्गत तयार करुन सादरीकरण करण्यात आले.


समस्यांबाबत नागरिकांशी संवाद वाढवा : आमदार लांडगे
परिवर्तन हेल्पलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महावितरण संदर्भात अनेक समस्या माझ्यापर्यंत देत असतात. मात्र, प्रशासनाकडून त्याला योग्य प्रतिसाद दिला जात नाही. महाविरण प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्योजक, व्यापारी, नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. परिवर्तन हेल्पलाईन आणि सोशल मीडियातून आलेल्या तक्रारींचे निराकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांशी संवाद वाढवला पाहिजे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी दिली आहे.
*
शिवसेनेची मागणी आमदार महेश लांडगेंची पुर्तता…
रुपीनगर, ताम्हाणेवस्ती भागात वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये वारंवार विघाड होत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महाविरणच्या भोसरी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार महेश लांडगे बैठकीसाठी याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. संबंधित अधिकाऱ्यांनी निधीअभावी केबल बदलता येत नाही, अशी अडचण सांगितली. यावर आमदार लांडगे यांनी तात्काळ निर्णय घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळे केबल उपलब्ध झाली. त्यामुळे रुपीनगर, ताम्हाणेवस्ती भागातील वीज समस्या निकालात निघणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी करावी आणि आमदार लांडगे यांनी त्याची पूर्तता करावी, असा ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ अनुभव महावितरण अधिकाऱ्यांना आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *