दलित पँथरचा ४९ वा वर्धापन दिनसंपन्न…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.११जून २०२१ (ओझर):दलित पॅंथरचे संस्थापक महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या विचारातुन स्थापन झालेल्या या सामाजिक चळवळीच्या संघटनेचा नुकताच पुणे येथे ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला महिला व पँथर व पदाधिकारी उपस्थित होते.कोविडच्या सर्व नियमांचे पालन करुन हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.यावेळी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुखदेव तात्या सोनवणे म्हणाले की,”दलित पँथर बाळकडू आमच्या घरात आम्हाला आमच्या वडिलांकडुनच मिळाले आहे. डाॅ.बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारी ही संघटना आहे.दलित पँथरची निर्मिती हि मागसवर्गीय जातींवरी अत्याचारांचा कळस गाठला.त्यावेळी दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली.दलितांवरील वाढत्या अत्याचाराला थांबविण्यासाठी ,प्रामुख्याने मागास,कष्टकरी,कामगार,भूमिहीन शेतमजूर,गरीब,शेतकरी,भटक्या जाती जमाती,आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हंणुन दलित पॅंथरची समाजात ओळखले जाते.सर्वांनी एकत्र येऊन माणुस म्हणुन जगण्याचा हक्क मागितला पाहीजे.”यावेळी विविध आठवणींना पँथरच्या उजळा देण्यात आला.अनेक मान्यवरांनी पँथरच्या असलेल्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यामध्ये पँथर सुखदेव तात्या सोनवणे(अध्यक्ष- दलित पँथर),कार्यक्रम स्वागताध्यक्ष पँथर प्रकाशदादा साळवे व निमंत्रक पँथर शुभम सोनवणे ,पँथर अशोक कांबळे,मनिषा गायकवाड,दत्ता गायकवाड,बापु वैराट,येरवडारोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र शिंदे,मयुर पवार,सोहिल जाधव,राहुल सांळुके,रुबीना शेख,मनिषा मेश्राम,निकिता निरभवणे,विठ्ठल केदारी,भावना गायकवाड,विक्रांत कांबळे,संजय जाधव,राहुल तायडे,पप्पु मसुडे,अण्णा सकट,राहुल सोनवणे,मयुर पवार,राजेश गायगवळी,सोहील जाधव,या कार्यक्रमाचे सूञसंचालन जुन्नर,आंबेगाव,खेड तालुका अध्यक्ष पँथर प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.आभारप्रदर्शन शुभम सोनवणे यांनी मानले.यावेळी पदाधिकारी व मान्यवरांना शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *