पीएमपीएमएलची दहा रुपयांत दिवसभर प्रवास योजना पिंपरी चिंचवड शहरात राबवा – राजू मिसाळ विरोधी पक्षनेते पिं चिं मनपा

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि ९ जुलै २०२१
पिंपरी चिंचवड शहरातील पूर्वश्रमीची पी.सी.एम.टी. व पी.एम.टी. या दोन संस्थाचे विलनीकरण करण्यात येऊन पी.एम.पी.एम.एल.कंपनीची स्थापना करण्यात आली असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या हिस्साप्रमाणे मनपा पीएमपीएमएलकडे वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या अगोदर देत असते. तरी सुध्दा ह्या दोन संस्थाचे विलनीकरण झाल्यापासूनच पिंपरी चिंचवड शहरावर बसमार्ग असो अथवा पूर्वश्रमीच्या पीसीएमटीच्या कर्मचा-यांवर पदोन्नती असो अथवा बदल्याबाबत कायमच अन्याय करीत आलेली आहे. आता सुध्दा पुणे शहरासाठी पीएमपीएमएलची दहा रुपयांत कुठेही दिवसभर फिरा हि योजना आजपासून सुरु होत आहे. या योजनेसाठी पुणे शहरातील ९ मार्ग निश्चित केले असून ५० मिडी बस त्यासाठी असतील व डिसेंबरमध्ये संपूर्ण पुणे शहरासाठी ३०० बसेस उपलब्ध झाल्यानंतर या योजनेचा विस्तार केला जाणार आहे.

Advertise

पुणे महानगरपालिकेतील पदाधिकारी व प्रशासनास हि योजना राबविता येते तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनास पिंपरी चिंचवड शहरात हि योजना का राबविता येत नाही? पिंपरी चिंचवड पालिकेचे सत्ताधारी पदाधिकारी नागरीकांच्या फायद्याच्या योजना राबविण्याचे सोडून पे अँड पार्क योजने सारख्या योजना राबवून कोरोनामुळे नागरीक आर्थिकदृष्टया हतबल झाले असताना नागरीकांना वेठीस व भूर्दड बसविणा-या योजना राबविन्यात धन्यता मानत आहेत. जे पुण्याच्या पदाधिका-यांना जमू शकते ते पिंपरी चिंचवडच्या सत्ताधारी पदाधिका-यांना का जमू नये ?

तरी आपणांस विनंती आहे की, पुणे महानगरपालिका ज्या पध्दतीने पुणे शहरासाठी १० रुपयांत दिवसभर प्रवास हि योजना राबवित आहे, त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरासाठी १० रुपयांत दिवसभर फिरा हि योजना तातडीने पिंपरी चिंचवड शहरासाठी राबविण्यात यावी. असे पत्र पिंपरी चिंचवड च्या महापौर माई ढोरे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *