ग्रामीण भागात अखेर शाळेची घंटा वाजली……15 जुलै पासून होणार शाळा सुरू…मात्र अटी आणि शर्थी लागू…..

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यास राज्य सरकारने बुधवारी परवानगी दिली. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने ठराव करणे बंधनकारक असणार आहे.
याच धर्तीवर आज सकाळी डिंगोरे येथील पुष्पावती विद्यालयात पालक व शिक्षक समन्वय सभा घेण्यात आली यात इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करून पालक ग्रामपंचायत पदाधिकारी व शिक्षक, पालक यांनी एकत्र येऊन पालकांचे म्हणणे समजावून घेतले व लवकरच ग्रामपंचायत स्थरावर समिती स्थापन करून सर्वानुमते योग्य निर्णय घेऊन शासकीय नियमानुसार शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल असे सरपंच सौ.सीमाताई सोनवणे यांनी सांगितले


ज्या गावामध्ये कमीत कमी एका महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही, अशाच गावांमध्ये वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी योग्य ती खबरदारी घेऊन या पुढे गावातील कोरोना रुग्णसंख्या नक्कीच कमी करून प्रशासनाला आपला निर्णय शिथिल करण्याची विनंती करू,व पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार पॅटर्न वापरून डिंगोरे येथील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करू असे डिंगोरे पिंपळगाव जोगा जि प गटाचे सदस्य अंकुश आम्ले यांनी आपल्या मनोगतात सांगितले,

Advertise


या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री असवार सर, शालेय समितीचे अध्यक्ष श्री संपत लोहोटे, पांडुरंग मंडलिक, सरपंच सीमाताई सोनवणे, उपसरपंच निलेश लोहोटे, तंटामुक्ती अध्यक्ष, अहिलूनाना लोहोटे उपाध्यक्ष राजेंद्र शेठ सुकाळे शिक्षक व पालक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *