मंचर मधील अंगणवाडी ची दुरवस्था वारंवार पाठपुरावा करून ही मंचर ग्रामपंचायत चे दुर्लक्ष…

मंचर मधील वार्ड क्र.२ मधील बाजारतळा जवळ असणारी अंगणवाडी ही अत्यंत दयनीय अवस्थे मध्ये असल्याचे आढळून आले यावेळी भाजपा मंचर शहराध्यक्ष नवनाथ थोरात यांनी मंचर ग्रामपंचायतकडे  बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार सादर  करून वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला ही मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचा आरोप केला तसेच याठिकाणी जीवितहानी झाली असता जबाबदार कोण असा सवाल ही केला त्याचवेळी सदर अंगणवाडी दुरुस्तीसाठी *एकात्मिक बाल विकास सेवा योजने* अंतर्गत मंचर ग्रामपंचायतला आलेल्या निधीचा वापर करून अंगणवाडी ची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा ही दिला.


   याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता मा. बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प मंचर चे श्री. प्रीतम बारभुवन यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही मंचर ग्रामपंचायत ला सदर क्र.१ च्या अंगणवाडीसाठी १ लक्ष चा निधी वर्ग होऊन १ वर्षा पेक्षा अधिक कालावधी लोटला असल्याचे सांगून मंचर ग्रामपंचायत प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याची व्यथा व्यक्त केली.

Advertise

सदर अंगणवाडी दुरुस्तीबाबत मा.गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असेल सांगितले प्रकल्प मंचर च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *