राजगुरुनगर येथील संगम कपड्याच्या दुकानाला आज चार वाजल्याच्या सुमारास दुकानातील दुरुस्तीची कामे सुरु असताना लागली आग …आगीत कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान …जिवितहानी मात्र टळली

राजगुरूनगर, दि. 7/7/2021

बातमी – प्रतिनिधी, अक्षता कान्हूरकर, राजगुरूनगर

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे असलेले राजगुरुनगर शहरातील संगम कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे लॉकडाऊनमध्ये कपड्याचे दुकान बंद असल्याने दुकानात दुरुस्तीची कामे सुरु होती यावेळी अचानक आग लागली आहे.

या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले असून घटनास्थळी विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) मधील व राजगुरूनगर,आळंदी परिषदेच्या अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र १ तासापासून लागलेल्या भीषण आगीवर अजूनही नियंत्रण आले नाही.

घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वाहतूक रोखून आगीच्या बंब जाण्यायेण्यासाठी रस्ते मोकळे केले. राजगुरूनगर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक मदत कार्य हाती घेतले आहे. आगीचे लोट अजूनही कायम सुरू असून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *