तेजस्विनी महिला संस्था ,लोणी काळभोर यांच्या वतीने ऑनलाईन महिला शिबिर संपन्न…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.७ जून २०२१(ओझर):तेजस्विनी महिला संस्था,लोणी काळभोर, पुणे यांच्यातर्फे आयोजित तेजस्वी झेप अंतर्गत महिला उद्योजिकांसाठी उद्योजकतेच्या यशाची गुरुकिल्ली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ७५ महिलांनी आपला उत्फूर्त सहभाग नोंदविला.नावनोंदणी करणाऱ्या सहभागी महिलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र दिले गेले.
कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी अध्यक्षा- श्रीमती शुभांगीताई राजकुमार काळभोर,तेजस्विनी मार्गदर्शक-सौ. संगीताताई काळभोर, तेजस्विनी सल्लागार डॉ. अलका नाईक. सौ. जयश्रीताई नांदे, तेजस्विनी सहायक, मुख्याध्यापिका सौ. संगीताताई लंघे, तेजस्विनी कार्यकर्त्या. या सर्वांनी सुंदर नियोजन व उत्कृष्ट आयोजन करून आजचे (६जुलै २०२१) शिबिर उत्कृष्टरित्या पार पडले.
व्यवसाय निर्मिती आणि व्यवसाय मार्केटिंग यासंदर्भात एक ऑनलाईन वेबिनार/ शिबिर गुगल मीट या अॅपद्वारे घेण्यात आले.यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी साधुन महिलांनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या शिबिराचे आदरणीय मार्गदर्शक पुढीलप्रमाणे होते.*
सौ.रुपा कानविंदे,एम्.एस्.सी.सल्लागार,न्यूट्रिशन आणि फूड प्रोसेसिंग.

Advertise


डॅा. प्रकाश कोंडेकर , निसर्गोपचार तज्ञबीएस्सी ॲानर्स, डॅाक्टर ॲाफ नॅचरोपॅथी, आयुर्वेदरत्न,ऑनररी डायरेक्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी.
डॉ. अलका नाईक मुंबई, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री, या सर्व मान्यवरांनी महिलांच्या सर्व प्रश्नांना समर्पकपणे सर्वांना समाधान मिळेल अशी अभ्यासपूर्ण व अनुभवपूर्ण उत्तरे दिली. अनेक महिला भगीनींनी या शिबिराचा लाभ घेऊन, आपल्या शंकांचे निरसन करून घेत आपल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला. उत्कृष्ट अशा वातावरणात हे शिबिर पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *