पै. मंगलदास बांदल प्रकरणात, शिवाजीराव भोसले बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनाही, शिक्रापूर पोलिसांनी चौकशी कामी घेतले ताब्यात…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिक्रापूर : दि. 04/07/2021.

  पुणे जिल्हा परिषदेच्या बाधंकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले बँकेतील तीन व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केलीय. यात -

१) प्रदीप निम्हण,
२) नितीन बाठे,
३) गोरख दोरगे
या तिघांचा समावेश आहे.
या तिघांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत, त्यांना अटक झालीय.
वडगाव शेरी शाखेचे गोरख महादेव दोरगे, औंध शाखेचे प्रदीप सहदेव निम्हण, कोथरुड शाखेचे नितीन मारुतराव बाठे
या तीनही व्यवस्थापकांनी, बांदल यांना नियमबाह्य कर्ज मंजुर केलेले होते.
२६ मे रोजी शिक्रापूर येथील दताञय रावसाहेब मांढरे (रा. शिक्रापूर) यांनी बांदल यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावरुन पहिला गुन्हा दाखल झाला होता.

   दुसरा गुन्हा रविंद्र सातपुते यांच्या तक्रारीवरुन, ३० मे रोजी दाखल झालेला होता. 
  नंतर १ जूनला मंदार पवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व गुन्हे शिवाजीराव भोसले बँकेतुन फसवणुक प्रकरणातुन दाखल झाले आहे. बांदल यांच्यासह पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. बँकेच्या तीनही अधिकाऱ्यांना शिरुर न्यायालयात हजर केले जाणार आहे. या तीनही प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने सुरु असल्याची माहिती, पोलिस निरिक्षक हेंमत शेडगे यांनी दिली.
   शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, शिवाजीराव भोसले सहकारी बँक मधील कर्ज प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयात शिवाजीराव भोसले सहकारी बँक शाखा वडगाव शेरी, येथील तत्कालीन शाखा अधिकारी गोरख महादेव दोरगे यांनी कर्जदार आरोपी यांना त्यांचे अधिकाराचा दुरूपोयग करून, कर्ज मंजुर करण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानेच, त्यांना सदर गुन्हयात अटक केली असुन, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत.

  रविंद्र गेनभाऊ सातपुते यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीवरून, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमधील कर्ज प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयात शिवाजीराव भोसले सहकारी बँक शाखा औंध, येथील तत्कालीन शाखा अधिकारी प्रदीप सहदेव निमन, यांनी कर्जदार आरोपी यांना त्यांच्या अधिकाराचा दुरूपोयग करून, कर्ज मंजुर करण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना सदर गुन्हयात अटक केली असुन पुढील तपास नितीन अतकरे, सहा. पोलीस निरीक्षक शिक्रापुर पोलीस स्टेशन, हे करत आहेत.

  तसेच, मंदार महेंद्र पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमधील कर्ज प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयात शिवाजीराव भोसले सहकारी बँक, शाखा कोथरूड येथील तत्कालीन शाखा अधिकारी नितीन मारूतराव बाठे, यांनी कर्जदार आरोपी यांना त्यांचे अधिकाराचा दुरूपोयग करून, कर्ज मंजुर करण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना सदर गुन्हयात अटक केलेली असुन, पुढील तपास अमोल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक, शिक्रापुर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 या सर्व घडामोडींमुळे आता बांदल अटक प्रकरणात आणखी घडामोडी वाढल्याने, बांदल यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत असून, या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *