निगडी येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज व श्री. छत्रपती शिवाजी महाराज व अर्थात भक्ती शक्ती येथील दुमजली उड्डाणपुलाचे उद्धघाटन- राष्ट्रवादीची राजकीय कुरघोडी

रोहित खर्गे
विभागीय संपादक

निगडी- दि ३० जून २०२१
पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशव्दारावरील निगडी येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज व श्री. छत्रपती शिवाजी महाराज व अर्थात भक्ती शक्ती येथील दुमजली उड्डाणपुलाचे काम केव्हाच पूर्ण झालेले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. पुणे – मुंबईकडील वाहतुक सुरळीत होण्यासाठी त्याच प्रमाणे या चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून या दुमजली उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते. या परीसरातील नागरीकांना तीन वर्षापासून दोन अडीच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते त्यामुळे सदर दुमजली पुलाचे उद्धघाटन करुन तो वाहतूकीस खुला करणेबाबत या परीसरातील नागरीक, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षाची मागणी सातत्याने होत होती.

या परीसरातील नागरीकांचा असंतोष व होणारी गैरसोय लक्षात घेऊन सदर दुमजली पुल सार्वजनिक वाहतूकीसाठी उध्दघाटन करुन खुला करणेबाबत मा. महापौर यांना १७/०६/२०२१ रोजी पत्र दिले होते परंतु या दुमजली पुलाच्या उद्धघाटनाबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन सत्ताधारी व प्रशासनाने न केल्यामुळे या परीसरातील नागरीकांचा तीव्र असंतोष लक्षात घेता आज बुधवार दिनांक ३०/०६/२०२१ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज व श्री. छत्रपती शिवाजी महाराज अर्थात भक्ती शक्ती येथील दुमजली उड्डाणपुलाचे उद्धघाटन करण्यात आले.

     या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक तानाजी खाडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, राष्टवादी शहर युवती अध्यक्षा वर्षा जगताप, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पिंपरी महिला विधानसभा अध्यक्षा, पल्लवी पांढरे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगिता कोकणे, भोसरी महिला विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, विशाल काळभोर  संजय लंके, अमोल भोईटे, पुष्पा शेळके, यश साने तसेच पक्षाचे प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी ने निवडणूक जवळ आल्याने ही राजकीय कुरघोडी केली असून यावर आता सत्ताधारी भाजप काय उत्तर देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *