आदिवासी पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तळेघर या ठिकाणी स्वछतागृहाची मागणी…

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
भीमाशंकर (तळेघर )या ठिकाणी स्वछतागृहाची मागणी, पश्चिम आदिवासी भागामध्ये मुख्य बाजारपेठ असलेल्या तळेघर या ठिकाणी विविध गाव,वाडया, वास्त्यांमधून मोठया प्रमाणात लोकं बाजारासाठी येत असतात यामध्ये प्रामुख्याने महिला, पुरुष, लहान मुलेही येत असतात, परंतु या ठिकाणी मोठया प्रमाणात प्रश्न भेडसावतो तो महिलांच्या स्वछतागृहाचा, कारण या बाजारपेठ मध्ये मोठया प्रमाणात आर्थिक उलाढाल होतं असते येथील व्यापाऱ्यांकडून ग्रामपंचायत करही वसूल करते परंतु त्या दृष्टीने महिलांच्या या आरोग्याच्या दृष्टीने भेडसवनाऱ्या बाबीकडे कोणतेच पाऊल गांभीर्याने उचलले जात नाही याची दखल आरोग्य विभागाणे घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा आशी मागणी येथील  ग्रामस्थ  सागर कोकाटे, युवा नेते मारुती दादा केंगले,सखाराम वाबळे, सतीश कोकाटे, सुभाष तिटकारे यांनी केली आहे.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *