राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, पलक मुच्छल सन्मानित…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.२९ जून २०२१ (ओझर): राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभ‍िनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.


सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे रविवारी (दि. २७) आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले.यावेळी विशाखा सुभेदार म्हणाल्या की हा स्त्री शक्ती पुरस्कार माझ्यासाठी स्वप्नवत आहे. प्रचंड आनंद .. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं.
मलबार हिल ‘ राजभवन ” ला जाण्याचा योग आला.लेकाला बरोबर घेऊन गेले होते,नेमक महेश ला काम होत अन्यथा तो हि असता..!
आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम,
आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. “आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिल आणि भरून आलं..””
नवरा फोनवरून सतत संपर्कात तो हि जाम खुश, सासूबाई,जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड,सगळ्यांसगळ्यांचे कौतुकाचे फोन
मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय..
मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्त चे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या देवाचे आभार…!

Advertise


हा पुरस्कार मला माझ्या कामासाठी मिळालाय आणि त्याकरिता काही मंडळी अतिशय महत्वाची आहेत ज्यांच्याशिवाय माझं काम अधुरं राहील असतं. आमची टीम “हास्यजत्रा “
सचिन गोस्वामी आणि सचिनजी मोटे आणि माझा पार्टनर,मित्र, समीर कफाले आणि प्रसाद खांडेकर आणि नम्रता,योगेश संभेराव आणि पँडी कांबळे आणि सोनी मराठी चे मनापासून आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *