वडगावमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून सभामंडप, रस्त्यांचे काम सुरू…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

मावळ, २२ जून २०२१
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून वडगावमध्ये सभामंडप आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम कालपासून सुरू झाले. खासदार बारणे आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

वडगाव येथील श्री भैरवनाथ दत्तनगरी सभामंडप बांधण्यासाठी स्थानिक खासदार निधीतून 30 लाख रुपये आणि सभामंडप आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी खासदार बारणे यांनी दिला होता. या कामाचे काल (सोमवारी) भूमिपूजन करण्यात आले. आमदार शेळके, नगराध्यक्ष मयुर ढोरे, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, विठ्ठल शिंदे, गणेश ढोरे, बाळासाहेब ढोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertise

खासदार बारणे म्हणाले, “मावळ लोकसभा मतदारसंघातील वडगावमध्ये नगरपरिषदेची निर्मिती झाली आहे. वडगावसह तळेगांव दाभाडे, लोणावळा हा शहरीकरणाचा भाग आहे. वडगावमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. नव्याने मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास येत असून या भागाचा विकास होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सर्वाधिक खासदार निधी वडगाव मावळला दिला आहे. त्यानुसार सभामंडप, अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल”.