कोंढवळ येथील चोंढीच्या धबधब्यात बुडालेला तरूण पाचव्या दिवशीही बेपत्ताच…

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ 
मोसीन काठेवाडी
कोंढवळ येथील चोंडीबा धबधब्यात गुरुवार दि. १७ रोजी सकाळी ९ :३० वाजल्याच्या  सुमारास पाय घसरून पाण्यात पडलेला, शिक्रापूर येथे कामानिमित्त  वास्तव्यास असलेला युवक लक्ष्मण लहारे (मुळ गाव राहता. अहमदनगर  )वय २९ वर्ष याचा सोमवारी दि.२१ रोजी पाचव्या दिवशी शोध लागला नाही.
साकेरी गावच्या बंधाऱ्या पासून कोंढवळ धबधब्याकडे उलट दिशेने ७ किलोमीटर पर्यंतच्या प्रवाहमध्ये, शोध घेवून देखिल तपास लागला नाही .


    सदर शोध मोहिमेत पोलिस उपनिरिक्षक  लहु शिंगाडे, साहायक फौजदार जिजाराम वाजे, होमगार्ड युवराज केंगले, होमगार्ड दीपक काटे, कोंढवळ गावचे पोलीस पाटील सुभाष कारोटे, पालोदे गावचे पोलीस पाटील विजय मेमाने, राजपुरचे पोलीस पाटील उत्तम वाघमारे, राजपुर गाडीवाडीचे पोलीस पाटील सतीश भोते, तळेघर चे पोलीस पाटील संतोष भवारी, कोंढवळ चे ग्रामस्थ किसन जोशी, महाळुंगे गावचे ग्रामस्थ किसन भालचीम, साकरी गावचे ग्रामस्थ शिवाजी वाघ, पांडुरंग वाघ, बेपत्ता युवक लक्ष्मण लहारे याचे मित्र अजय कहाणे व रवि कदर मंडलगी.आदी ग्रामस्त सहभागी झाले होते. पोलिस पाटील ग्रामस्तांनी मिळुन शोधण्याचा अथक प्रयत्न केला तरीही बेपत्ता युवक लक्ष्मण लहारे हा मिळून आलेला नसल्याने शोधकार्य सोमवारी सायंकाळी थांबवण्यात आले, आज मंगळवार दि. २२ रोजी  देखिल शोधमोहीम सुरूच ठेवणार असल्याचे घोडेगावचे नवनियुक्त साहायक  पोलिस निरिक्षक लहु थाटे म्हणाले.

Advertise