प्रतिनिधी-कैलास बोडके
ओतूर(ता. जुन्नर) येथील धोलवड परीसरातील शेतकरी वसंत गजानन नलावडे यांच्या विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळून आला आहे .
याबाबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर ओतूर वनपरी क्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर ,वनपाल सुधाकर गीते ,अतुल वाघूले, सुदाम राठोड ,कर्मचारी फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव, साहेबराव पारधी यांच्या टीम ने रेस्क्यू करत या बिबट्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. बिबट्या रात्रीच्या वेळी भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडला असून मृत झाला असावा अशी शक्यता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. बिबट्याचे वय अंदाजे८ वर्ष असून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत डुंबरे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.