कोंढवळ येथे बुडालेल्या युवकाचा शोध तीसऱ्या दिवशी एन.डी.आर.एफ. येवून देखिल लागला नाही उदया चौथ्या दिवशी रविवारी शोध मोहिम चालु रहाणार – अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील यांची माहिती..

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील व श्री क्षेञ भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील चौंढीच्या धबधब्यात पडुन शिक्रापुर येथुन आलेला लक्ष्मण सोन्याबापु लहारे (मुळ गाव राहता ) हा २९ वर्षाचा तरुण गुरुवार (दि.१७) रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास बेपत्ता झाला होता. आज ४८तासा नंतरही एन.डी.आर.एफ.च्या जवानांना  बेपत्ता झालेल्या युवकास काढण्यास यश आले नाही.

कोंढवळ येथील चौंडीचा धबधबा हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो.परंतु हा धबधबा अत्यंत धोकादायक असल्यामुळे बाहेरुन आलेल्या पर्यटकांना ह्याचा अंदाज येत नाही. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिक्रापुर येथुन निघालेले लक्ष्मण सोन्याबापु लहारे हे आपल्या तीन मिञ व दोन लहान मुलां सोबत भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले परंतु कोरोना महामारीमुळे मंदीर बंद असल्यामुळे हे सर्व वर्षा विहारासाठी कोंढवळ येथील चौंडीच्या धबधब्याकडे गेले. सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मुख्य धबधब्या जवळील पाण्याजवळ लक्ष्मण सोन्याबापु लहारे हा गेले असता पाय घसरुन पाण्यात पडला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धबधब्याच्या खाली असलेल्या कुंडामध्ये हा जावुन पडला.या नंतर घोडेगाव पोलिस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी वनविभाग अधिकारी व कर्मचारी कोंढवळ येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी गुरुवारी व शुक्रवारी ह्या दोन दिवस शोध घेण्यास मोठे अथक प्रयत्न केले परंतु गुरुवारी सायंकाळी सात वाजे पासुन या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ह्या चौंडीच्या धबधब्याचा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे मदत कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत.

त्यामध्येच पाण्यामध्ये आलेल्या गढुळीमुळे शोध घेणे ही तारेवरची कसरत बनली आहे.दरम्यानच्या काळामध्ये अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील,उपविभागिय पोलिस अधिकारी अनिल लंभाते, घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लहु थाटे, पोलिस उपनिरिक्षक लहु शिंगाडे, सहाय्यक पोलिस फौजदार जिजाराम वाजे ,पोलिस नाईक दिपक काशिद हे घटनास्थळी थांबुन शोध मोहीमेस मदत करत होते.

Advertise

एन.डी. एफ.चे पोलिस निरिक्षक प्रमोद राय,राम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जवान शोध घेत होते. आज शनिवारी दिवस भर शोध घेवुन एन.डी. आर.एफ.च्या टीमला मृत देह काढण्यात यश आले नाही. उदया चौथ्या दिवशी रविवारी शोध मोहिम चालु रहाणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील,यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *