आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.19/6/2021
बेल्हे येथील शासकीय गोदामे ग्रामपंचायतीस द्या:- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार
बातमी:-रामदास सांगळे विभागीय संपादक,जुन्नर
बेल्हे (ता.जुन्नर) येथील उपबाजार आवारातील दोन शासकीय मोठी गोदामे ग्रामपंचायत मिळावीत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मंचर विभागाचे उपविभागीय अधिकारी सारंग कडोलकर, जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की बेल्हे उपबाजार आवारात ब्रिटिशकालीन दोन मोठी शासकीय गोदाम असून सद्यस्थितीत मोडकळीस आलेली आहेत.
पूर्वीच्या काळी या गोदामांमध्ये धान्य साठा ठेवण्यात येत होता.आता थेट वितरण व्यवस्था असल्यामुळे याची कोणतीही गरज नाही. ती गोदामे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे आहेत. या जागेत पुणे येथील महात्मा फुले मंडई च्या धर्तीवर दैनंदिन बाजार सुरू करण्याचे प्रयोजन आहे. त्यातून तरुणांना रोजगार शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू शकेल व परिसरातील लोकांची ही सोय होऊ शकेल.तसेच परिसर स्वच्छ ते बरोबरच शेतमालाच्या वाहतूक खर्चात बचत होऊन ग्रामपंचायतीस कायमस्वरूपी उत्पन्नाचा नवीन मार्ग निर्माण होईल.