राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी चळवळ मजबूत करू जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांचं विटा येथे प्रतिपादन..

राजू थोरात तासगांव प्रतिनिधी
विटा (सांगली)
जिल्ह्यातील विविध विद्या शाखेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना मजबूत करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी केले ते विटा येथे खानापूर तालुका पदाधिकारी नियुक्तीसाठी आयोजित मुलाखती दरम्यान बोलत होते.अध्यक्षस्थानी खानापूर तालुका अध्यक्ष किसन भाऊ जानकर होते.यावेळी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले तीस हून अधिक विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आ.सुमनताई पाटील युवानेते रोहीत दादा पाटील यांच्या आदेशानुसार गुणवत्ता असणाऱ्या आणि राजकारणात सक्रिय काम करू इच्छिणाऱ्या तरूणांना संधी म्हणून मुलाखतीमधून पदाधिकारी नियुक्ती करत असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप मुळीक,राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुशांत देवकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर तालुका अध्यक्ष किसन जानकर,वक्ता सेल चे जिल्हा अध्यक्ष श्री संतोष जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ माने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा निरीक्षक कैलास दादा शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नईम मुलाणी मिडिया सेलचे महेश फडतरे,सिद्धार्थ शितोळे,सत्यजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत खानापूर तालुका राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस चे अध्यक्ष नईम मुलाणी यांनी आभार मानले.