जिवघेणा हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद…चोवीस तासात बिबट्याला जेरबंद करण्यास ओतूर वनविभागाला यश…

प्रतिनिधी-कैलास बोडके

ओतूर(ता.जुन्नर) घुलेपट येथे बिबट्याने निलेश घुले या युवकावर हल्ला करून त्यास गंभिर जखमी केलेल्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच हल्ला करणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
बिबट्याचा हल्ला परतवून लावताना अत्यंत धाडसाने निलेशचे केवळ दैव बलवत्तर म्हणून तो बालंबाल बचावला आहे.


या घटनेमुळे घुलेपट आणि परिसरातून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते, वनविभागाने नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ता.१५ रोजी सायंकाळी ओतूर हद्दीतील घुलेपट येथे हल्ला झालेल्या घटनास्थळापासून सुमारे २०० फूट अंतरावर भक्षासह बदगी ओढ्याजवळ भरत मनोहर तांबे यांचे शेतात पिंजरा लावला असता भक्षाच्या शोधात असलेला तो हल्ला करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.
पकडलेला बिबट्या नर जातीचा असून अंदाजे ९ वर्षे वयाचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी बिबट्या च्या हल्ल्यात जखमी झालेल्या निलेश घुलेचे वडील ज्ञानेश्वर घुले यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसताच त्यांनी ताबडतोब वनविभागाशी संपर्क करून कळविले असता जुन्नर सहा. वनसंरक्षक अमित भिसे,वनपाल सुधाकर गीते, वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर,वनपाल ए. बी. वाघोले,वनरक्षक सुदाम राठोड,वनमजुर फुलचंद खंडांगळे,गंगाराम जाधव आदींनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पकडलेल्या बिबट्यास ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात सोडले आहे.

Advertise


दरम्यान घुलेपट, पानसरे वाडी,डुंबरे मळा, न्हावपट्टी,कांडाची आई हा सर्व परिसर जवळ जवळ असून या भागात वारंवार बिबटे निदर्शनास येत असल्यामुळे या भागात एकूण किती बिबट्याचे वास्तव्य आहे याचा अंदाज येत नसल्यामुळे येथील नागरिक बिबट्याच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत परिणामी वनखात्याने आणखी काही दिवस याच परिसरात पिंजरा लावण्याची मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *