मराठा आरक्षणासंदर्भात पाठिंबा दर्शविण्यासाठी व शासनाला निवेदन देण्यासाठी शिरुरला समाजबांधव जमले एकत्र..

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. 16/06/2021.

      मराठा आरक्षणासंबंधात, शिरुर तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतिने, कोल्हापुर येथे होत असलेल्या, “मराठा आरक्षण मुक आंदोलनाला” व छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यात सहभाग दर्शविण्यासाठी, शिरूर येथे सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र जमत व हाताला काळ्या फिती बांधून, शांततेत आंदोलन केले.

     शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
तसेच, शासनाने मराठा समाजाला आरक्षण न देता खेळवत ठेवल्याच्या निषेधार्थ, शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगिताने करण्यात आला.

     त्यानंतर सदर निवेदन हे शिरुर तहसिल कार्यालय, तसेच शिरूर पोलिस स्टेशनला देण्यात आले.

Advertise


      या प्रसंगी संजय बारवकर, राजेंद्र जाधवराव, योगेश ओव्हाळ, नाथा पाचर्णे, रमेश दसगुडे, बाबुराव पाचंगे, अशोक शेळके, वर्षा काळे, सोनाली घावटे, वैशाली ठुबे, सतिश धुमाळ, अभिजित आंबेकर, अनिल बांडे, सुशांत कुटे, निलेश नवले, प्रशांत व्यवहारे, योगेश महाजन, अनिल सोनवणे, शैलेंद्र शेळके, अविनाश जाधव, गोकूळ ढवळे, संपत दसगुडे, राजेंद्र दसगुडे, किरण घावटे यांसह अनेक मराठा समाजबांधव उपस्थित होते.