दिव्यांगांच्या उपोषणाची अखेर तात्पुरती स्थगिती..

प्रतिनिधी-कैलास बोडके

पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील दिव्यांगांनी २०११पासुनचा ३ % निधी न दिल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला त्यानंतर ग्रामपंचायतने सामंजस्याची भूमिका घेतल्याने दिव्यांगांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेत सरपंच यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे.
गेली अनेक वर्षापासून दिव्यांग आपल्या हक्कासाठी लढत आहेत, परंतु त्यांना कुणीही दाद देत नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला तेव्हा २०११ पासुन २०१६ चा निधी कुठे गेला ही शोधशोध सुरु झाली ग्रामपंचायत मध्ये याआगोदर अनेक वेळा लेखी मागणी करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

दिव्यांगांना ३% निधी रोजगार विषयक मार्गदर्शन व रोजगार उपलब्ध करून देने, व्यवसायासाठी शासनाच्या जी आर प्रमाणे गाळे उपलब्ध करून देने हे न करता अद्याप पर्यंत स्वताच्या पद्धतीने मनमानी करून गाळे वाटप करने, अखर्चित निधी जिल्हा परिषद कडे वर्ग केला असल्याचे तोंडी सांगणे त्यानंतर लेखी माहितीत निधी जिल्हा परिषद कडे वर्ग केला नाही अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने हा उपोषणाचा मार्ग करवा लागला असल्याची माहिती मिळाली आहे.

त्याच वेळी उपसरपंच अमोल वंडेकर यांनी दिव्यांगांशी संपर्क करून उपोषण करू नका आपन त्यातून मार्ग काढू असे सांगितले. त्यामुळे उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले आहे
याप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे विभाग प्रमुख महेंद्र फापाळे, पिंपरी पेंढार संघटनेचे सर्व सदस्य यांनी सरपंच सुरेखाताई वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर, ग्रामसेवक जंजाळ यांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *