ग्रामिण भागात हॉटेल रेस्ट्रॉरंट चालू करावीत यासाठी असो. चे अध्यक्ष बाळासाहेब दाते यांचे पुणे जिल्हाधिकारींना निवेदन..

चाकण : –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागात लॉकडाऊनमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना  बंदचा फटका बसुन त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असुन सध्य स्थितीला हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक मोठया अडचणीत सापडले आहे.
त्यामुळे पुणे जिल्हयाचे मा. जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख यांची पुणे ग्रामीण हॉटेल आणि रेस्टॉरंट असो. चे अध्यक्ष श्री बाळासाहेब दाते यांनी भेट घेतली. या विषयावर जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख यांच्याशी  हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालू करावीत, बारमध्ये पार्सल(take away )सुविधा सुरू करावीत ई. मागण्यांचे निवेदन देण्यात आले.कलेक्टर साहेबांनी येत्या दोन- तीन दिवसात ग्रामीण भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालू करू असे आश्वासन अध्यक्ष बाळासाहेब दाते यांना दिले.

Advertise