आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विभाग शाळेला भाजपाचा ‘एक हात मदतीचा’

– प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनानिमित्त बांधकाम साहित्य भेट

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १४ जून २०२१
तळागाळातील सर्वांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाजाच्या जडणघडणमध्ये मोठे योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

आंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम भागातील श्री. पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने बांधकाम साहित्य भेट देण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शाळेला बांधकाम साहित्याची भेट देण्यात आली.

Advrtise

यावेळी श्री. पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, सरपंच नंदाताई कोळप, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, सचिव आंबेकर गुरुजी आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मोडून महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी दिला. हे संस्कार या विद्यामंदिरात घडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे या मातीशी आणि शाळेशी एक आत्मीयतेचे नाते आहे. हेच संस्कार या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतील. आंबेगाव तालुक्याच्या खाली डिंबे धरण आहे. या धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्यातील वरच्या गावांना मिळावे. यासाठी १९७२ सालापासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. मात्र, भाजपा काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने पाणी उपसा करण्यासाठी लागणाऱ्या वीजबीलापैकी ८० टक्के वीजबील सरकारच्या वतीने भरले जाईल, असा धाडसी निर्णय घेण्यात आला, अशी आठवणही आमदार लांडगे यांनी यावेळी सांगितली.

‘श्रम शिक्षणातून ध्येय पूर्ती’ असे ब्रिद घेवून १ मे १९८२ साली आंबेगाव तालुक्यातील पोखरी या गावी श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळाची स्थापना करण्यात आलì