शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे मालक चालक वाहतुक व्यावसायिकांनी जगायचे कसे की आत्महत्या करायची केंद्र सरकार व राज्य शासन वाट पाहत आहेत ? शिव स्वराज्य विद्यार्थी वाहतुक मंचाचे पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १२ जून २०२१
गेले दीड वर्षा पासून शाळा बंद असल्यामूळे आमचा उत्पन्नाचं मार्ग बंद झाला आहे. फायनान्स कंपनी, बँक कर्जाच्या हप्त्या साठी तगादा लावत आहे. आम्ही जगायचे कसे हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे तर गाडी चे हप्ते भरण्यासाठी पैसे आणायचे कोठून . चोला मंडलम फायनान्स कंपनी ,ऐ यू फायनान्स कंपनी, एच डी बी फायनान्स व इतर बॅंक कर्ज हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. फायनान्स कंपनी ने तर गुंडप्रवृतीचे लोकांना कर्ज हप्ते वसूल करण्यासाठी पाठवून शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे मालक चालक यांचे जगणे मुश्किल केले आहे.
आजच्या परिस्थितीला केंद्र सरकार व राज्य शासन जबाबदार आहे. जर कामं बंद झाल आहे तर आम्ही कर्ज हप्ते भरण्यासाठी पैसा आणायचे कोठून त्यासाठी काय फाशी घ्यायची, का किडनी विकायची आम्ही.
सरकार म्हणून आपली पण जबाबदारी आहे की प्रत्येक घटकाला योग्य ती मदत करायला पाहिजे सरकारने.

पण यात केंद्र सरकार व राज्य शासन दोघेही शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे मालक चालक या घटकाला दुय्यम वागणूक देत आहेत. केंद्र सरकारने आमचे शालेय वाहनांचे कर्ज हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दीलीच पाहीजे.आम्ही पण माणूसच आहोत आम्हाला पण सन्मानाने जगायचा अधिकार आहे. आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या शाळेची वाहने आर टी ओ नियमाने गाडी पासिंग करतो, इनसुरंस करतो मग या कोरोना काळाच्या संकटात जर शाळा बंद असल्यामूळे आम्ही वाहणाचे कर्ज हप्ते भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो.
आज आमचे कुटूंब कीती अडचणीत आले आहे हे आम्हाला माहीती आहे. साहेब प्रथम आपण फायनान्स कंपनी व बॅक यांच्या कडून होणारी पिळवणूक थांबवून आम्हास सहकार्य करावे ही विनंती करत आहोत . आम्ही आपनाकडे कडे काही मागण्या करत आहोत, त्या आपण येत्या आठ दिवसात मान्य कराव्यात हीच अपेक्षा. नाही तर शेवटी शेतकरी बांधवांना जशी आपले जीवन संपविण्याची वेळ आली होती तशीच वेळ आम्हा शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे मालक चालक यांच्या कुटुंबियांवर येईल.
तरीआपण आमची चोला मंडलम फायनान्स कंपनी व इतर फायनान्स कंपनी आणि बॅंक यांच्या कडून होणारी पिळवणूक थांबवून आम्हास सहकार्य करावे ही विनंती.
1) लाॅकडाऊन काळातील कर्ज