ब्रेकिंग – माळशेज घाटात कोसळली दरड…सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

माळशेज, दि. 11/6/2021

बातमी – प्रतिनिधी दीपक मंडलिक, माळशेज

आज सायंकाळी नगरहून कल्याणच्या दिशेने जात असलेली चार चाकी नगरहून कल्याणच्या दिशेने जात असताना माळशेज घाटामध्ये बोगद्याच्या अलीकडे आपली चार चाकी रस्त्याच्या कडेला थांबून चहा पाण्यासाठी थांबले असताना अचानक मोठी दरड गाडीवर

कोसळली सुदैवाने जीवितहानी झाली नाही चार चाकी मधील दोन्ही प्रवासी सुखरूप असून त्यांची चार चाकी दुरुस्तीसाठी उचलून नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते


ही कार विजय रत्नाकर माचवे यांच्या मालकिची असुन ते पार्किंग करुन उतरले होते सुदैवाने ते बचावले.घटना स्थळी महामार्ग पोलिस मदत कार्य करत आहेत.
महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे…