बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
रांजणगाव : दि. 10/06/2021
रांजणगाव एम.आय.डी.सी. समोरील पुणे-अहमदनगर रोडलगत असणाऱ्या तोरणा हाॅटेल नजीक, असलेल्या लाकडाचे वखारीजवळ राहणारा आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम (वय 23 वर्षे), हा दि. 17/05/2021 रोजी पहाटे च्या 05.00 सुमारास राहत असलेल्या ठिकाणाहून कोणासही, काही एक न सांगता निघुन गेला असलेबाबतची तक्रार, त्याचा चुलत भाऊ अवनीश रामब्रिश कुमार याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे मानव मिसींग नं. 36/2021 प्रमाणे दि. 17/5/2021 रोजी नोंदविली होती. सदर मानव मिसींग बाबत संशय निर्माण होत, मिसींग व्यक्तीचा नातेवाईक अवनीश रामब्रिश कुमार रा. सोहम पार्क, रांजणगाव गणपती ता. शिरूर, जि. पुणे याने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 217/2021, भा.दं.वि. कलम 364, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
मिसींग झालेली व्यक्ती नामे वखारीजवळ राहणारा आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौतम वय 23 वर्षे, रा. तोरणा हाॅटेल जवळ लाकडाचे वखारीमागे, रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे याचे बाबत घातपात झाला असावा, असा संशय वाढत चालल्याने मा. पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, पद्माकर घनवट यांना सुचना करून बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सपोनि. सचिन काळे, म.पोसई देशमुख मॅडम, पोहवा. जनार्दन शेळके, पो.ना. राजु मोमीण, पो.ना. अजित भुजबळ, पोना चंद्रकांत जाधव, पो.ना. मंगेश थिगळे, म.पो.हवा. नंदा कदम, म.पो.काॅ. पुनम गुंड, चा.पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथक नेमण्यात आले होते. रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मानव मिसींगचा सखोल तपास करून दाखल गुन्हयातील आरोपींच्या हालचालींवर पाळत ठेवली असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील अपहरीत इसम नामे आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौैतम हा दि. 17/05/2021 रोजीचे पहाटेच्या वेळी, इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याचे घरात आल्याचे इस्लाम सम्मानी व त्याचे मुलांनी पाहीले.
त्या गोष्टीचा राग आल्याने आरोपी इस्लाम बिस्मील्ला सम्मानी याने, मुलांचे मदतीने त्याचा खुन केला आहे अशी बातमी मिळाल्याने, इस्लाम बिस्मील्ला सम्मानी वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, त्याने सांगितले की दिनांक 17/05/2021 रोजी पहाटे 02.45 वाजण्याचे सुमारास इस्लाम हा लघवीसाठी उठलेला असताना, त्यास अपहरीत इसम नामे आषिशकुमार सुभाशचंद्रकुमार गौैतम हा इस्लाम सम्मानीचे घरात आल्याचे समजले. म्हणून त्याने त्याची दोन मुले अब्दुल व रियाज यांना उठवून त्या तिघांनी मिळून आषिशकुमार यास लाकडी दांडक्यांनी व लोखंडी राॅडने मारहाण करून, त्यास जिवे ठार मारले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा मुलगा नामे रियाज इस्लाम सम्मानी, वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे यास देखील ताब्यात घेवून दोन्ही आरोपी नामे
1) इस्लाम बिस्मील्ला सम्मानी, वय 41 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे.
2) रियाज इस्लाम सम्मानी, वय 20 वर्षे, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे.
या दोघांना रांजणागाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असुन, पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व मदतनीस पोना विलास आंबेकर हे करत आहेत.