निमगाव सावा येथे शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.9/6/2021

निमगाव सावा येथे शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणे वाटप

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व आयटीसी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव, आळेफाटा यांच्या माध्यमातून शरदचंद्र पवार ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट सेंटर निमगाव सावा च्या सहकार्याने ४० शेतकऱ्यांना मोफत फुले जातीचे सोयाबीन बियाणे व त्यासाठी आवश्यक औषधे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच यावेळी आयटीसी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पवार यांनी शेती आणि पर्यावरण यावर भविष्यात येणाऱ्या संकटांचा धोका व्यक्त करुन कमी रासायनिक खतांचा वापर आणि अवगत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा असे सांगितले व आयटीसी व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तर माळी यांनी शेतात वारंवार तीच पिक घेतल्याने होणारे दुष्परिणाम व त्यासाठी काय काळजी घ्यावी व शेतकऱ्यांनी सरकारच्या विमा योजनांचा फायदा घ्यावा यासाठी आवाहन केले. तसेच के व्ही के चे शेटे यांनी शेतकऱ्यांना शेतातील पिकावर येणारे रोग व त्याची कारणे सांगुन काळजी घ्यावी असे मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा परिषद पांडुरंग पवार बोलताना म्हणाले की निमगाव सावा येते यंदा ७ हजार ५०० वृक्ष ग्रामपंचायत जागेत, रस्त्यांच्या साईडला व शेतकऱ्यांच्या बांधावर लागवडीचे नियोजन केल्याचे सांगितले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे, नारायणगाव के व्ही के चे प्रशांत शेटे, योगेश यादव, राहुल घाडगे, आय टी सी चे भरत राऊत, प्रशांत साळवे, उपसरपंच किशोर घोडे, परशुराम लगड, संतोष गाडगे,योगेश गाडगे, भाऊ थोरात, नजिर चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *