ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके
दि.९ जून २०२१ ( ओझर )
:जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाविषयी बालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, या दर्जेदार साहित्यसंस्थेचा
कोकण प्रदेश विभाग, पुणे विभाग, तेजस्विनी महिला संस्था, पुणे आणि जि.प. प्राथमिक शाळा कोरेगाव भिवर, ता.दौंड,जि.पुणे, यांच्यातर्फे आयोजित बाल कवींचे दुसरे राज्यस्तरीय ऑनलाइन भव्य काव्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
६ ते १५ या वयोगटातील बाल कवी / कवयित्रींनी यावेळी आपल्या स्वलिखित मराठी कविता स्वतःच्या आवाजात सादर केल्या. सर्व बाल कवींना डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत कोरोनाशी संघर्ष करून पावसाचा आनंद द्विगुणित करूया….पुन्हां ताजेतवाने होऊ या…. काव्यसरींमध्ये चिंब भिजत हि बालकाव्य मैफिल रंगून गेली होती.
यावेळी श्री शरद गोरे सर.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अ.भा.म.सा.प.पुणे. श्रीमती शुभांगीताई काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा,अ.भा.म.सा.प.
पुणे.अध्यक्ष- तेजस्विनी संस्था,पुणे. डॉ.अ.ना.रसनकुटे कोकण प्रदेशाध्यक्ष,अ.भा.म.सा.प.पुणे.डॉ.अलका नाईक
कोकणप्रदेश उपाध्यक्षा अ.भा.म.सा.प.पुणे.
सल्लागार- तेजस्विनी संस्था, पुणे.सौ. जयश्री नांदे पुणे विभागीय सचिव – अ.भा.म.सा.प.पुणे. सदस्या- तेजस्विनी संस्था पुणे. सौ. संगिताताई काळभोर,मुक्तांगण चॅनेलच्या पत्रकार रामेश्वरी आहेर,दैनिक गावकरीचे पत्रकार राजेंद्रकुमार शेळके, केंद्रप्रमुख श्री.संपत सटाले, डॉ. शोभा खंदारे प्राचार्या- डायट विस्तार अधिकारी श्री. गोरक्ष हिंगणे, श्री.संदिप तोडकर,श्री. सोमनाथ लंघे,श्री. संदिप कदम,श्री. मनोज म्हाळसकर, सौ. हर्षना म्हाळसकर, सौ. माधुरी शेजवळ,सौ.योगिता नातू,श्री.सोमनाथ लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बालकाव्य संमेलनाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका श्रीमती संगिता लंघे यांनी तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षिका श्रीम. सुजाता गायके यांनी मानले.हे संमेलन यशस्वी होण्यासाठी शा.व्य.समिती.ग्रामपंचायत, शिक्षक वृंद जि.प. प्राथ. शाळा कोरेगाव भिवर, ता. दौंड, जि. पुणे.यांनी विशेष योगदान दिले.