जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांच्या “औदयोगिकरण व प्रकल्पग्रस्त” या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे, शिरूर.
मुंबई : दि. 04/06/2021.

जनता दलाचे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, यांनी लेखन केलेल्या औद्योगिकरण व प्रकल्पग्रस्त या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.
पुस्तकाविषयी आपले मत व्यक्त करताना राज्यपालांनी सांगितले की, “शेवाळे हे स्वतः प्रकल्पग्रस्त असून, त्यांना शासन दरबारी न्याय मागताना जो अनुभव आला व त्यांना जो संघर्ष करावा लागला, त्याबद्दल त्यांनी ‘औदयोगिकरण व प्रकल्पग्रस्त’ हे पुस्तक लिहिले व त्याचे प्रकाशन करण्यासाठी त्यांनी मला विनंती केली होती. जर कोणावर अन्याय झाला असेल व त्यांनी जर याबद्दल पुस्तकरूपात माहिती लिहिली असेल, तर त्याचे कौतुक करायला पाहिजे, यासाठीच त्यांना पुस्तक प्रकाशित करत शुभेच्छा देत आहे. प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवावर आधारित हे लेखन असल्यामुळे, याचा फायदा प्रकल्पग्रस्त व शासन यंत्रणांना उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मला वाटतो आहे”असे राज्यपाल यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

या पुस्तकाचे प्रकाशन महामहिम भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. 4 जून 2021 रोजी, मुंबई येथे राज्यपाल भवन येथे करण्यात आले. यावेळी जनता दल (से) महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, लेखक व युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, संग्राम शेवाळे, अजय गलांडे, किसन गवारी, अक्षय ओतारी, पत्रकार भिमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *