जुन्नर
पवन गाडेकर
निवासी संपादक
दि.05/06/2021
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जुन्नर तालुक्यातील सभासद पत्रकार बांधवाना आयकार्ड वाटप पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांच्या हस्ते तर शिवसेनेचे उपनेते शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मास्क सॅनिटायझर चे वाटप नगराध्यक्ष शाम पांडे उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी गटनेते समिर भगत यांच्या हस्ते करण्यात आले…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष राजेश डोके पुणे जिल्हा प्रिंट चे उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी जुन्नर तालुक्यातील सभासद पत्रकार बांधवांना आयकार्ड मिळावे यासाठी संघाचे अध्यक्ष वसंत मुंढे राज्य संघटक संजय भोकरे सचिव विश्वासराव आरोटे यांच्याकडे मागणी केली असता तात्काळ ओळखपत्र देण्याचे आश्वासन सचिव विश्वासराव आरोटे यांनी देत आज 5 जून रोजी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे अध्यक्ष अतुलसिंह परदेशी यांच्या हस्ते आयकार्ड वाटप करण्याच्या सुचना अध्यक्ष राजेश डोके यांना दिल्या…
जुन्नर येथे छोट्या खाने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विठ्ठल शितोळे यांनी केले तर आभार पत्रकार रमेश बेळे यांनी मानले यावेळी जुन्नर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे अध्यक्ष पवन गाडेकर माजी ,अध्यक्ष अशोक डेरे ,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, प्रा.किशोर चवरे, गंगाधर रसाळे ,कैलास बोडके, गोपीनाथ शिंदे ,भरत अस्वार, मनोहर हिंगणे, बाळासाहेब साबळे पत्रकार बांधव तसेच जुन्नर शहर शिवसेना प्रमुख चंद्रकांत डोके ,माजी नगरसेवक वैभव मलठनकर आदी उपस्थित होते…