घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
स्वर्गीय श्रीकांत संभाजी काळे पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीकांतच्या आठवणीत सामाजिक कार्य म्हणून व या कोरोना संकटकाळात रक्ताच्या तुटवडा भासू नये म्हणून भव्य रक्तदान शिबिर हे रविवार दिनांक ३०.०५.२०२१ रोजी सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत श्री साल सिद्धेश्वर मंदिर सभागृह सालगाव ,तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ,मास्क सॅनिटायझरचा वापर करून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक अँड वैभव राजेंद्र काळे पाटील यांनी दिली तसेच घोडेगावातील व पंचक्रोशीतील सर्व मंडळ सर्व ग्रुप व संघटना सहभाग घ्यावा अशी विनंती अँड वैभव राजेंद्र काळे यांनी केली आहे. लस घेतल्यानंतर १५ दिवसांनी रक्तदान करता येते. तसेच कोरोना झाल्यानंतर दीड महिन्यांनी रक्तदान करता येते अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
शिवसेनेतर्फे पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स…
रोहित खर्गेविभागीय संपादक पनवेल- २९ मे २०२१शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सहकार्याने आणि मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग…