पिंपरी चिंचवड पालिकेच्या भाजपच्या नगरसेवकाचा प्रताप बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने प्राधिकरणाची जमीन लाटण्याचा प्रयत्न. नगरसेवक राजेंद्र लांडगे गजाआड…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी – दि २८ मे २०२१
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे जागा असतानाही बनावट कागदपत्रे, संमती पत्र ,ताबा पावती, साठे खत बनवून जागा विकून त्यापोटी 15 लाख 80 हजार रुपये बळकवणाऱ्या महानगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकासह दोघांना भोसरी पोलिसांनी केले गजाआड. हा प्रकार 20 मे 2019 रोजी उघडकीस आला. भाजप नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२ ) भोसरी यांच्यासह मनोज महिंद्र शर्मा (वय ३८) राहणार भगत वस्ती तर रविकांत सुरेंद्र ठाकूर ४२ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस.एस. भुजबळ (वय ३७ ) यांनी भोसरी पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      राजेंद्र लांडगे हे भोसरी धावडे भगत वस्ती येथून भाजपच्या चिन्हावर  निवडून आले असून स्थायी समितीचे माजी सदस्य तर सध्या "क" प्रभागाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नगरसेवक लांडगे यांनी इंद्रायणीनगर येथील  प्राधिकरणाच्या सर्व्हे नं २२ मधील ९३६ चौरस फूट जागा शर्मा आणि ठाकूर ला 15 लाख 80 हजार रुपयांना विकली. या  जागेवर अतिक्रमण करून शर्मा आणि ठाकूरने 1872 चौरस फूट बांधकाम बांधले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड महानगरपवलिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. बनावट कागदपत्रे देऊन  महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले. भोसरी पोलीस तपास करत आहे दरम्यान प्राधिकरणाची जागा विकून नगरसेवकाने पैसे लाटल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या  राजकारणात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *