मंचर शहरासाठी अत्याधुनिक गॅस विद्युत शवदाहिनी कामाचा शुभारंभ!

मंचर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन याठिकाणी अत्याधुनिक गॅस व विद्युत शवदाहिनी व्हावी अशी मंचर ग्रामपंचायतीची गेल्या ३ वर्षांपासूनची मागणी होती. त्यादृष्टीने या कामासाठी गृहमंत्री ना.श्री.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी खा. शिवाजीराव आढळराव व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून सुमारे ७५ लक्ष रकमेच्या गॅस विद्युत शवदाहिनी मंजुरीसाठी प्रयत्न केले व त्यास यश आले. या गॅस विद्युत शवदाहिनीचा भूमिपूजन समारंभ माजी खा. शिवाजीराव आढळराव यांचे शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, सुनील बाणखेले, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य प्रा.राजाराम बाणखेले, मंचर सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.